16 May 2025 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

Droneacharya Aerial Innovations Share Price | होय! कमी कालावधीत शेकडो टक्के परतावा देणारा स्टॉक रॉकेट वेगात उडणार? ही बातमी येताच..

Droneacharya Share Price

Droneacharya Aerial Innovations Share Price | शेअर बाजारात ‘ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन’ कंपनीचा IPO आला होता, आणि याला अक्षरशः गुंतवणूकदारांनी डोक्यावर घेतले होते. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन’ कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी मल्टीबॅगर कमाई केली आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीचे शेअर्स 3.20 टक्के वाढीसह 153.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 3.28% वाढून 157 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीने नुकताच ड्रोन तयार बनवण्यासाठी एका खाजगी कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 243.35 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 96.90 रुपये होती. ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीने ड्रोनचे उत्पादन करण्यासाठी ‘ग्रिडबॉट्स’ या कंपनीसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. ड्रोन आचार्य एरियल इनोवेशनने आपल्या निवेदनात अहमदाबादस्थित कंपनी ‘Gridbots Technologies Pvt Ltd’ सोबत ड्रोन आणि इतर काही तांत्रिक उद्देशांसाठी भागीदारी केल्याची माहिती जाहीर केली आहे. ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीने या भागीदारी अंतर्गत नवीन उत्पादने आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा करार केला आहे. या भागीदारीसह ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनी आपले उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीचे पुढील लक्ष :
ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनी स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीला पुण्यात ड्रोन बनवण्यासाठी स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करायचे आहे. या कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालयही पुण्यात आहे. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन’ कंपनी ‘ग्रिडबॉट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी सामंजस्य करार म्हणजेच MoU वर स्वाक्षरी केली होती. ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीचे एकूण बाजार भांडवल 355 कोटी रुपये आहे. या कंपनीने 34 कोटी रुपये भांडवल उभरण्याठी आपला IPO लाँच केला होता. ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन कंपनीचा IPO 13 डिसेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर 23 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Innovations Share Price 543713 in focus check details on 01 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Droneacharya Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या