
DroneAcharya Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 200 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे.
ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन स्टॉक 0.31 टक्के घसरणीसह 194 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, या करारा अंतर्गत ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीला मेकॅनाइज्ड आर्मी कोर्सेस ग्रुप, अहमदनगर येथे क्षमता वाढ आणि अपग्रेडेड ड्रोन प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनी मेकॅनाइज्ड आर्मी कोर्स ग्रुप, MIC & S, अहमदनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्याना कुशल ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देणार आहे.
ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीने म्हटले आहे की, कंपनी भारतीय लष्कर, संरक्षण मंत्रालयासोबत सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ड्रोनआचार्य कंपनीचे 201 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचे शेअर्स 27 ऑक्टोबर 2023 रोजी 221 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचा IPO डिसेंबर 2022 रोजी 52 रुपये ते 54 रुपये प्राइस बँडवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
23 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स एसएमई एक्स्चेंजवर 90 टक्के वाढीसह 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी देखील ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.