12 December 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या
x

RVNL Share Price | RVNL शेअर पैसे गुणाकारात वाढवणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तुफान खरेदी सुरु

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमधे घसरणीचा ट्रेण्ड सुरू होता. मात्र शुक्रवारी या शेअरने मंदीचा ट्रेण्ड मोडीत काढला आहे. आरव्हीएनएल कंपनीने 19 जुलै रोजी स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, लवाद न्यायाधिकरणाने त्यांची SPV कंपनी असलेल्या कृष्णपट्टणम रेल्वे कंपनी लिमिटेड कंपनीच्या बाजूने निर्णय देऊन रेल्वे मंत्रालयाला 584.22 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

ही भरपाई कृष्णपट्टणम रेल्वे कंपनी आणि रेल्वे मंत्रालय यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी होती. या संयुक्त उपक्रमात KRCL कंपनीने 49.76 टक्के भागभांडवल धारण केले आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 4.66 टक्के वाढीसह 613.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, त्यांनी युनायटेड कन्स्ट्रक्शन लिमिटेड या इस्रायली कंपनीसोबत एक सामंजस्य करार संपन्न केला आहे. याअंतर्गत दोन्ही कंपन्या इस्रायलमध्ये रेल्वे, एमआरटीएस, बोगदे, रस्ते, पूल, बांधकामे, विमानतळ, बंदरे, सिंचन, वीज पारेषण आणि सौर व पवन क्षेत्रातील प्रकल्प उभारणार आहेत.

लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी मार्च 2024 तिमाहीच्या अखेरीस आरव्हीएनएल कंपनीतील आपला वाटा 0.09 टक्क्यांवरून वाढवून जून तिमाहीत 0.19 टक्क्यांवर नेला आहे. एलआयसी आणि एफपीआयने देखील एप्रिल ते जून 2024 या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवली आहे.

शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 5.65 टक्क्यांच्या वाढीसह 619.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसभराच्या व्यवहारात या स्टॉकने 8 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. 2024 या वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 240.27 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 416.26 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 20 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x