7 May 2025 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Droneacharya Share Price | मल्टिबॅगर ड्रोनआचार्य एरियल शेअरने एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, नवीन घोषणेने शेअर पुन्हा तेजीत

Drone acharya Share Price

Droneacharya Share Price | ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी अफाट तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स काल 20 टक्के वाढीसह 182.80 रुपये किमतीची क्लोज झाले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अचानक तेजी पाहायला मिळाली होती. ही तेजी एका सकारात्मक बातमीमुळे आली होती. नुकताच ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड कंपनीने एक नवीन ड्रोन लाँच केले आहे आणि त्याचे नामकरण भुजंग असे केले आहे.

भुजंग नावाचे हे नवीन ड्रोन जॉइंट अॅटॅक, नेव्हिगेशन आणि गार्डिंगसाठी बॅटलफिल्ड हायब्रिड यूएव्ह, हेवी लिफ्ट ऑफ, सुपर-हाय-अल्टीट्यूड विविध क्षमता असलेले लांब पल्ल्याचे ड्रोन आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के घसरणीसह 180.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड कंपनीने आपल्या नवीन ड्रोन भुजंग बद्दल माहिती देतात म्हंटले आहे की, हे ड्रोन भारतातील पहिले सुपर हाय अल्टीट्यूड मल्टीरोल ड्रोन आहे. हे ड्रोन 4,800 मीटर उंच टेक ऑफ पॉईंटवरून 1,500 मीटर एजीएल उंची गाठण्यास सक्षम आहे. आणि या ड्रोनची आणखी एक खासियत अशी की, हे लढाऊ, वाहतूक आणि पाळत ठेवण्याची क्षमता असलेले दक्षिण आशियाई देशाने बनवलेले पहिले ड्रोन आहे. या ड्रोनची पूर्ण निर्मिती भारतात झाली आहे. खऱ्या अर्थाने हे ड्रोन आपण स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवले आहे, असे म्हणू शकतो.

ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड कंपनीचा IPO डिसेंबर 2022 शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आणि त्याची इश्यू किंमत 52-54 रुपये जाहीर करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

सध्या हा स्टॉक टेक्निकल चार्टवर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, आणि 150 दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरी किमतीवर ट्रेड करत आहे. ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन लिमिटेड या कंपनीचे बाजार भांडवल 438.51 कोटी रुपये होते आहे

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DroneAcharya Share Price today on 12 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Drone acharya Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या