
Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 20 रुपये वरून वाढून 594 रुपये किमतीवर पोहोचली आहे. 8 मे 2020 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मल्टीबॅगर परतावा दिला
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 204 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 192 रुपयेवरून 594 रुपयेवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 581.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विदेशी आणि म्युच्युअल फंडांनी केली खरेदी
31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रवर्तकांनी 59.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 2.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर म्युच्युअल फंडांनी 0.84 आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत इलेकॉन इंजिनिअरिंग ही स्मॉल कॅप कंपनी 1960 साली स्थापन झाली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,274.22 कोटी रुपये आहे.
कंपनीची प्रमुख उत्पादने
इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये ट्रान्समिशन लाइन इक्विपमेंट, मटेरियल होल्डिंग इक्विपमेंट्स, स्क्रॅप, एक्सपोर्ट प्रमोशन यांचा समावेश होतो. मार्च 2023 तिमाहीमध्ये इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीने 432.35 कोटी रुपये कमाई केली आहे. मागील तिमाहीत कंपनीची कमाई 392.32 कोटी रुपये होती, ज्यात 10.20 टक्के वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यात इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30.50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.