13 December 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Elon Musk's Starlink Plans | भारतात हायस्पीड इंटरनेट मिळणार | 2022 पासून स्टारलिंक सेवा

Elon Musk's Starlink Plans

मुंबई, ०४ ऑक्टोबर | जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्टारलिंक ही उपग्रह कंपनी पुढील वर्षी डिसेंबरपासून भारतात ब्रॉडबँड सेवा (Elon Musk’s Starlink Plans) सुरू करू शकते. इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी कंपनी देशातील दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करेल. ग्रामीण भागातील बदलत्या जीवनात ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे महत्त्व यासंदर्भात कंपनी संसद सदस्य, मंत्री आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करेल.

Elon Musk’s Starlink Plans. backed satellite-based Starlink broadband started taking pre-orders globally from February 2021. The company’s website says users are required to pay $99 for Starlink’s broadband connection, which may roll out by 2022 :

स्पेसएक्सच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड युनिटने डिसेंबर 2022 पासून सरकारी मंजुरीसह दोन लाख सक्रिय टर्मिनलसह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले. भारतातील स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव रविवारी म्हणाले, “मी ऑक्टोबरमध्ये खासदार, मंत्री, सचिवांशी 30 मिनिटांचे आभासी संभाषण करण्यास उत्सुक आहे. भारतात पाठवल्या जाणाऱ्या 80 टक्के स्टारलिंक टर्मिनल्ससाठी आम्ही कदाचित दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करू. ”

याआधी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतातील ऑर्डरची संख्या 500 च्या पुढे गेलीय आणि कंपनी ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक आहे. कंपनी ग्राहकांना $ 99 किंवा 7,350 रुपये प्रति ग्राहक आकारत आहे. कंपनीने ग्राहकांना 50 मेगाबिट ते 150 मेगाबिट प्रति सेकंद इंटरनेट स्पीड देण्याचे आश्वासन दिलेय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Elon Musk’s Starlink Plans to focus on areas with more pre orders in India.

हॅशटॅग्स

#ElonMusk(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x