2 May 2025 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?

Highlights:

  • Expleo Solutions Share Price
  • तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला
  • त्तिमाही निकाल – 50 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा
  • एक्स्प्लो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीबद्दल थोडक्यात
Expleo Solutions Share Price

Expleo Solutions Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर, तुम्ही एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या मल्टीबॅगर स्टॉकने अल्पावधीत लोकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. 31 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 1525 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी 1568.80 रुपये होती. एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,557.92 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 1,530.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला

एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीच्या स्टॉकने दीर्घ आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 16.12 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 22 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 16.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. महिला दोन वर्षांत या शेअरची किंमत 146 टक्क्यांनी वाढली आहे. तर तीन वर्षांत गुंतवणूकदारांनी 740 टक्के नफा कमावला आहे.

त्तिमाही निकाल – 50 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा

मार्च 2023 च्या तिमाहीत एक्स्प्लेओ सोल्युशन्सने 42.60 टक्के वाढीसह 29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 20.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीची विक्री 18.2 टक्क्यांनी वाढून 231.1 कोटी रुपयेवर पोहोचली होती. मार्च 2022 तिमाहीत कंपनीची एकूण विक्री 195.5 कोटी रुपये होती.

आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीने 16.7 टक्क्यांच्या वाढीसह 234.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर FY22 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 201.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीच्या संचालक मांडले 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी शेअरधारकांना प्रति शेअर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या स्टॉकवर 5 रुपये म्हणजेच 50 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

एक्स्प्लो सोल्युशन्स लिमिटेड कंपनीबद्दल थोडक्यात

एक्स्प्लो सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः जागतिक अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा प्रदाता असलेल्या एक्स्प्लो ग्रुपचा भाग म्हणून ओळखली जाते. ही कंपनी अग्रगण्य संस्थांसोबत भागीदारी करून त्यांना त्यांच्या व्यवसायातील सकारात्मक बदलां संबंधित मार्गदर्शन करते. कंपनी त्यांना ऑपरेशनल उत्कृष्टता प्राप्त करण्यात आणि त्यांच्या व्यवसायाचे भविष्य घडविण्यात आणि सुधारण्यास देखील मदत करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Expleo Solutions Share Price today on 01 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Expleo Solutions Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या