3 May 2025 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Fineotex Chemical Share Price Today | 2 वर्षात 280% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, डिटेल्स पहा

Fineotex Chemical Share Price

Fineotex Chemical Share Price Today | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ या विशेष केमिकल कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. ‘आशिष कचोलिया’ यांनी ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीचे 2.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ‘फिनोटेक्स केमिकल’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील दोन वर्षांत या स्मॉल कॅप स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 280 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आशिष कचोलिया हे मिड कॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे मोठे गुंतवणूकदार आहेत. (Fineotex Chemical Limited)

फिनोटेक्स केमिकलमधील गुंतवणूक :
‘आशिष कचोलिया’ यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ‘फिनोटेक्स केमिकल’ कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. कंपनीच्या जानेवारी-मार्च 2023 तिमाहीमधील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ‘फिनोटेक्स केमिकल’ कंपनीचे 2.82 टक्के म्हणजेच 31,24,072 इक्विटी शेअर्स आशिष कचोलिया यांनी होल्ड केले आहेत.

डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीत त्यांची शेअर होल्डिंग 2.64 टक्के म्हणजेच 29,24,072 इक्विटी शेअर्स होती. ‘फिनोटेक्स केमिकल’ ही एक केमिकल उत्पादन करणारी कंपनी असून 1979 पासून भारतीय बाजारपेठेत व्यापार करत आहे. ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये स्थित आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमी करून दिली आहे. शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार असतानाही या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी कडक परतावा मिळवला आहे. मागील 2 वर्षात ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने लोकांना 283 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

16 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 199.27 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के वाढीसह 246.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,689 कोटी रुपये आहे.

आशिष कचोलिया पोर्टफोलिओ :
मार्च 2023 तिमाहीमधील ट्रेंडलाइनच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘आशिष कचोलिया’ यांच्या पोर्टफोलिओमध्ये 43 कंपन्याचे शेअर्स आहेत. यामध्ये खास करून हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, इन्फ्रा आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित कंपनीचे शेअर्स आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे नवीन गुंतवणुकदार आशिष काचोलिया यांचा पोर्टफोलिओ फॉलो करतात. कचोलिया यांच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य 1,780.4 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fineotex Chemical Share Price Today on 17 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Fineotex Chemical Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या