1 May 2025 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

PAN Card Surname | लग्नानंतर पॅन कार्ड वरील आडनाव बदलायचे असल्यास या स्टेप फॉलो करा, सहज काम होऊन जाईल

PAN Card Surname

PAN Card Surname | पॅनकार्ड, रेशनकार्ड आणि आधारकार्ड हे तिन्हीही डॉक्युमेंट प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाचे आहेत. अनेक कामांमध्ये याचा उपयोग केला जातो. तुमची ओळख पाटवण्यासाठी तुमच्याकडे या देशाचे आधारकार्ड असणे गरजेचे आहे. तसेच सर्व वित्तीय कारभार हे पॅनकार्डवर केले जातात. रेशनकार्ड देखील तुमची ओळख आणि पत्ता याचा पुरावा म्हणून वापरले जाते.

मात्र अनेक कारणांमुळे आपल्याला आपले पत्ते बदलावे लागतात. यात महिलांना तर आपल्या या सर्वच डॉक्युमेंटमध्ये लग्नानंतर बदल करावा लागतो. लग्नानंतर महिलेचे आडनाव बदलते. तर पॅनकार्ड, आधारकार्ड अशा सर्व ठिकाणी नाव बदलून घ्यावे लागते. हे नाव आपल्या डॉक्युमेंटवर नेमके कसे बदलून घ्यावे याची माहिती अनेक महिलांना नाही. त्यामुळे तुम्हाला देखील आपले आडनाव बदलून घ्यायचे असेल तर पुढील स्टेप्स फॉलो करा.

पॅनकार्डवरील नाव बदलून हवे असल्यास त्याचा अर्ज भरावा. त्यानंतर यासाठी लागणारे सर्व कागदपत्र सादर करत त्याचे चलन देखील भरावे लागते. हे चलन तुम्ही कॅश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा पद्धतीने देखील भरू शकता.

जर तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल तर त्यासाठी देखील वेगळा फॉर्म भरून द्यावा लागले. पत्ता बदलण्यासाठी लागणारे शुल्क वेगवेगळे आहे. जर तुमचा दुसरा पत्ता भारतातलाच असेल तर तुम्हाला 110 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच जर तुमचा पत्ता भारता बाहेरील असेल तर तुम्हाला 1020 एव्हढे शुल्क भरणे आवश्यक आहे.

सदर शुल्क भरल्यावर तुमचे पॅनकार्ड निवेदन अर्ज डाऊनलोड करून त्याचे शुल्क भरावे लागेल. तसेच त्याची प्रिंट काढून त्यावर दोन पासपोर्ट साईज फोटो चीटकवावे लागतील. त्यानंतर हा फॉर्म इतर कागपत्रे जोडून जमा करावा.

जी अतिरिक्त कागदपत्रे जोडायची आहेत त्यावर तुमची स्वाक्षरी असावी. तुमची स्वाक्षरी नसलेले कागदपत्र घेतले जात नाहीत. त्यामुळे सर्व कागदपत्र सेल्फेअतेस्टेड असावे. तसेच फॉर्मवर देखील आपली स्वाक्षरी करावी. त्यानंतर हे सर्व NSDL साठी पाठवले जाते.

तसेच https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकवर देखील तुम्हाला अर्जाचा फॉर्म मिळेल. त्यावर तुमच्या सध्याच्या पॅन कार्डचा क्रमांक टाकावा. नंतर ज्या ठिकाणचा पत्ता बदलायचा आहे त्या संबंधित काही पुरावा सादर केल्यावर तुमचा पत्ता बदलला जातो. अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही पत्ता बदलू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Follow these steps if you want to change your surname on PAN card after marriage 22 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

PAN Card Surname(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या