
Force Motors Share Price | फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बंपर वाढ पाहायला मिळाली होती. शुक्रवारी फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी सुरू होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1923.45 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र , त्यानंतर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झाली.
फोर्स मोटर्स शेअरने 10 दिवसात 40 टक्के परतावा दिला
मागील 10 ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये 40 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. फोर्स मोटर्स कंपनीचे बाजार भांडवल 2500 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.47 टक्के वाढीसह 1,905.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
फोर्स मोटर्स शेअरने दिलेला परतावा
फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. एका वर्षाच्या कालावधीत फोर्स मोटर्स कंपनीचे शेअर्स 83 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 25 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरमध्ये 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. एक महिन्याच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी 41.77 टक्के परतावा कमावला आहे.
फोर्स मोटर्स कंपनी तिमाही परिणाम
फोर्स मोटर्स कंपनीला मार्च 2022 च्या तिमाहीत 40 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. त्याच वेळी मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 149 कोटी रुपये नफा कमावला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने 152 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पूर्ण आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 74.6 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
गुंतवणूकदारांना 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा
या कंपनीच्या संचालक मंडळाने FY23 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 10 रुपये प्रति शेअर म्हणजेच 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. फोर्स मोटर्स कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये मुख्यतः हलकी व्यावसायिक वाहने, उपयुक्तता वाहने, छोटी व्यावसायिक वाहने, स्पोर्ट युटिलिटी वाहने आणि कृषी ट्रॅक्टर सामील आहेत.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.