14 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Gold Rate Today | खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मागील आठवडा चांगला ठरला आहे. संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात १४०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यापासून जवळपास 1400 रुपयांची घसरण झाली आहे. जाणून घेऊया गेल्या सोन्या-चांदीच्या दरात काय घडलं.

सोन्याचे दर घसरण्याचे मुख्य कारण
जगभरातील बँकर्स आपले व्याजदर वाढवत आहेत. अशा तऱ्हेने अमेरिकेसह त्या-त्या देशांचे व्याजदर वाढत आहेत. त्यामुळेच जगभरातील गुंतवणूकदार सोन्याऐवजी रोखे खरेदीवर भर देत आहेत. अशा तऱ्हेने सोन्याची मागणी कमी होत आहे. मागणीतील ही घट हे सोन्याचे दर घसरण्याचे मुख्य कारण आहे.

गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात झपाट्याने घट
देशातील सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात झपाट्याने घट झाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57719 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला. तर सोमवारी सोन्याचा हा दर 59129 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यामुळे गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव सुमारे १४१० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह बंद झाला आहे.

चांदीच्या दराबाबतबोलायचे झाले तर त्यातही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव प्रति किलो ७१६०३ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव सोमवारी 73015 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे संपूर्ण आठवडय़ात चांदीचा भाव सुमारे १४१२ रुपये प्रति किलोच्या घसरणीसह बंद झाला.

सध्या सोन्याचे दर उच्चांकी पातळीपेक्षा खूपच स्वस्त
सोने-चांदीचे दर सध्या च्या उच्चांकी पातळीपेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहेत. सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 3,866 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदी 4861 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today updates on 01 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x