 
						Force Motors Share Price | फोर्स मोटर्स कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत जबरदस्त व्यवसाय कामगिरी केली आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत फोर्स मोटर्स कंपनीला तोटा सहन करावा लागला होता. मात्र या तिमाहीत फोर्स मोटर्स कंपनीच्या नफ्यात 100 कोटीपेक्षा जास्त नफा झाला आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 20 टक्के वाढला
सेबीला मजबूत तिमाही निकालाची माहिती मिळताच कंपनीच्या शेअर मध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 1718.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.45 टक्के वाढीसह 1,812.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
फोर्स मोटर्स तिमाही निकाल
फोर्स मोटर्स कंपनीने मंगळवारी जाहीर केलेल्या आर्थिक निकालानुसार, मार्च तिमाहीत 146.62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 42.77 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. त्याच आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतही कंपनीला तोटा सहन करावा लागला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान फोर्स मोटर्स कंपनीला 15.57 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.
मागील एका महिन्यात शेअरने 34.39 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात फोर्स मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 34.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 16.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 70.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23.46 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		