
Gensol Engineering Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 2086 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 75 कोटी रुपये आहे. Gensol Share Price
जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या Gensol EV लीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 500 पेक्षा जास्त Tata Ace कार्गो EV वाहन पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक 1.19 टक्के वाढीसह 2,029.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ‘ही नवीन ऑर्डर ऑल-इलेक्ट्रिक लॉजिस्टिक कंपनीने दिली आहे. 20 पेक्षा जास्त इलेक्ट्रिकल वाहनांची सुरुवातीची बॅच आधीच भाडेतत्त्वावर पुरवण्यात आली आहे. उर्वरित वाहने पुढील 6 महिन्यांत 5 राज्यांमध्ये पुरवठा केली जाणार आहेत. या व्यतिरिक्त जेनसोल इंजिनिअरिंग कंपनी PSU, कर्मचारी वाहतूक संबंधित व्यवसाय, लास्ट माईल डिलिव्हरी या क्षेत्रात देखील व्यवसाय करत आहे.
मागील 6 महिन्यांत जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 मार्च 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1082.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 28 सप्टेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 2086 रुपये किमतीवर ट्रेड करत होत.
जेन्सॉल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 2121.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1310.25 रुपये होती. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2023 या वर्षात 104 टक्के परतावा कमवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.