 
						Gensol Engineering Share Price | जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत होते.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी जेनसॉल इंजिनीअरिंग स्टॉक 3.23 टक्के वाढीसह 910.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीच्या नियमांनुसार जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या शेअर धारकांना यापूर्वी देखील बोनस शेअर्स वाटप केले आहे. 11 ऑक्टोबर 2021 रोजी जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.
जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 15.67 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 2023 या वर्षात 1,015 रुपयेवरून वाढून 2,405 रुपयेवर पोहचली होती. बोनस शेअर्स वाटप केल्याने आज शेअरच्या किमतीत सुधारणा पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		