10 May 2025 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB
x

Genus Power Share Price | मल्टिबॅगर शेअरने अल्पावधीत दिला 210 टक्के परतावा, त्यापूर्वी 2425% परतावा दिला, खरेदी करावा?

Genus Power Share Price

Genus Power Share Price | शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.35 टक्क्यांच्या घसरणीसह 252 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6470 कोटी रुपये आहे.

जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 290 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 78 रुपये होती. नुकताच जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला विविध राज्य सरकारांकडून स्मार्ट प्रीपेड मीटरचा पुरवठा करण्याचे ऑर्डर मिळाले आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 254.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 1 वर्षात जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 210 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 800 टक्के वाढली आहे. मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2425 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा सेवेसाठी राज्य विद्युत मंडळाकडून 3121 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

जीनस पॉवर इन्फ्रा कंपनीला मिळालेल्या ऑर्डर अंतर्गत कंपनीला 36.27 लाख स्मार्ट प्रीपेड मीटरचा पुरवठा, इन्स्टॉलेशन आणि देखभाल संबंधित कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिनस पॉवर इन्फ्रा कंपनीला प्रगत मीटिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवेसाठी मिळालेल्या ऑर्डरचे एकूण मूल्य 3115 कोटी रुपये आहे.

जीनस पॉवर इन्फ्रा ही कंपनी भारतातील वीज मीटरिंग सोल्यूशन्स उद्योग अग्रणी मानली जाणारी कंपनी आहे. या कंपनीने संपूर्ण भारतातील वीज मीटरिंग सोल्यूशन उद्योगातील एकूण 27 टक्के वाटा काबीज केला आहे. ही कंपनी मुख्यतः मीटरची स्थापना, पुरवठा आणि विविध प्रकारची सेवा प्रदान करण्याचे काम करते. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा स्वतःचा ECC विभाग आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी भारतातील विविध राज्यांमध्ये स्मार्ट वीज मीटरिंग ऑपरेशन्स प्रोजेक्ट मिळवण्यासाठी निविदा दाखल करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Genus Power Share Price NSE 27 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Genus Power Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या