 
						GI Engineering Share Price | जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट लागत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. बुधवारी जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने सेबी ला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनी पुढील काळात आपल्या सध्याच्या व्यवसायासोबत चित्रपट निर्मिती, वितरण आणि इतर सेवा प्रदान करणार आहे. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 4.64 टक्के वाढीसह 12.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने प्रसिद्धी पत्रक जारी करून माहिती दिली की, मोहन नाडर, केतकी पंडित हे कंपनीचे संचालक मंडळाचे सदस्य म्हणून आपले काम करत राहतील. आणि स्मिता ठाकरे यांना सल्लागार मंडळाच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एका नवीन चित्रपट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी त्यांनी करारपत्रावर स्वाक्षरी देखील केली आहे. GI इंजिनिअरिंग सोल्युशन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हसीना मान जायगी-2 या नवीन फिल्मची निर्मिती जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स ही कंपनी करणार आहे. याचे दिग्दर्शक म्हणून फरहाद सामजी हे काम पाहणार आहेत.
जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स ही कंपनी मुख्यतः सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. जीआय इंजिनीअरिंग सोल्युशन्स या कंपनीच्या शेअरने 2023 वर्षी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. GI इंजिनियरिंग सोल्युशन्स कंपनीच्या शेअरने अवघ्या 8 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये एक वर्षापूर्वी पैसे लावले असते तर आता तुम्हाला 140 टक्के नफा सहज मिळाला असता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		