
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 150 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
25 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 15.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 181.99 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 14.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने जून तिमाहीत महसूल आणि निव्वळ नफ्यात मजबूत वाढ नोंदवली आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीचा महसूल 2.41 कोटी रुपये होता, जो जून 2024 तिमाहीत 556 कोटी रुपयेपर्यंत वाढला आहे. जून तिमाहीत या कंपनीचा PAT 70.83 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षी फक्त 1 कोटी रुपये होता.
मार्च 2024 तिमाहीत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने 50.29 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला होता. याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 377.35 कोटी रुपयेवर गेले होते. मागील वर्षीच्या मार्च 2023 तिमाहीत या कंपनीने 1.64 कोटी रुपये कमाई केली होती. या तिमाहीत गुजरात टूलरूम कंपनीचा एकूण खर्च वाढून 326.72 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जो मागील वर्षी 61 लाख रुपये होता.
गुजरात टूलरूम लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वैद्यकीय डिस्पोजेबल, फार्मा, फूड अँड बेव्हरेजेस पॅकेजिंग, लेखन उपकरणे, कॅप्स आणि क्लोजर आणि ओरल हायजीन आर्टिकल्ससाठी मोल्ड्स बनवण्याचा व्यवसाय करते. जुलै 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स फक्त 0.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1700 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.