
Hardwyn India Share Price | हार्डविन इंडिया या आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि ग्लास फिटिंग्जचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा करताच शेअर्समध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली आहे.
एक दिवसात शेअर 20 टक्क्यांनी वाढला
शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 623.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवस अखेरीस स्टॉक किंचित खाली आला आणि 19.90 टक्के वाढीसह 623.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या.गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे.
बोनस आणि स्टॉक स्प्लिट घोषणा
स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हार्डविन इंडिया कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्समध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपले शार्सा 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे.
याशिवाय हार्डविन इंडिया कंपनी प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक तीन इक्विटी शेअर्सवर1 रुपये दर्शनी मूल्याचा एक इक्विटी शेअर बोनस शेअर मोफत देणार आहे. या दोन्ही क्रियांची रेकॉर्ड डेट म्हणून 5 जून दिवस निश्चित करण्यात आला आहे.
14 महिन्यांत शेअरने 608 टक्के परतावा दिला
हार्डविन कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. हार्डविन कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घ कालीन तसेच अल्पकालीन गुंतवणूकदारांना भरपूर पैसा कमावून दिला आहे. मागील वर्षी 13 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आता हा स्टॉक 623.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांच्या पैशात 14 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 608 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 286.57 टक्के परतावा कमावून दिला आहे.
हार्डविन इंडिया ही कंपनी मुख्यतः आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि काचेच्या फिटिंग्ज व्यवसायात गुंतलेली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 125 टक्क्यांच्या वाढीसह 3.73 कोटी रुपयेवर पोहचला होता. मात्र त्याच कालावधीत कंपनीचा महसूल 11 टक्क्यांच्या घसरणीसह 29.88 कोटी रुपयांवर आला होता. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 165 टक्क्यांच्या वाढीसह 9.03 कोटी रुपयेवर पोहोचला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.