14 December 2024 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Inox Wind Share Price | मालामाल करणार आयनॉक्स विंड शेअर, यापूर्वी 900% परतावा दिला, आली फायद्याची अपडेट

Inox Wind Share Price

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारी 7 टक्के वाढीसह 152.70 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच या कंपनीच्या प्रवर्तकांनी आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये 900 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. याद्वारे ही कंपनी आपले कर्ज परतफेड करून कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी आयनॉक्स विंड एनर्जी स्टॉक 1.27 टक्के वाढीसह 159 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( आयनॉक्स विंड एनर्जी कंपनी अंश )

मागील एका वर्षात आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 290 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत हा स्टॉक 900 टक्के मजबूत झाला आहे. या काळात शेअरची किंमत 17 रुपयेवरून वाढून सध्याच्या 159 रुपये किमतीवर पोहचली आहे.

आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीने 28 मे 2024 रोजी ब्लॉक डीलद्वारे इक्विटी शेअर्स विकून भांडवल उभारणी केली होती. मे 2024 मध्ये या कंपनीने आपले 2.75 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 5 टक्के भाग भांडवल ब्लॉक डीलद्वारे विकले होते. या व्यवहारात कंपनीने शेअरची सरासरी किंमत 151 रुपये निश्चित केली होती. हे शेअर्स विकून कंपनीने 400 कोटी रुपयेपेक्षा जास्त भांडवल उभारणी केली होती.

आयनॉक्स विंड ही कंपनी मुख्यतः पवन ऊर्जा निर्मितीचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड ही कंपनी आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तक गटात सामील आहे. आयनॉक्स विंड कंपनी सध्या आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी भांडवल उभारणी करून काही रक्कम आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे. त्यामुळे कंपनीचा ताळेबंद मजबूत होईल. आयनॉक्स विंड कंपनीचे सीईओ कैलाश ताराचंदानी यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, प्रवर्तकांच्या गुंतवणुकीमुळे कंपनीला निव्वळ कर्जमुक्त होण्यास मदत होईल, आणि कंपनीचा ताळेबंद मजबूत होऊन व्यवसाय वाढीला गती मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Share Price NSE Live 05 July 2024.

हॅशटॅग्स

Inox Wind Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x