Hawkins Cookers Share Price | शेअर बाजारात हॉकिन्स कुकर्सची शिटी वाजली, 1 लाखावर 4 कोटी परतावा दिला, आता डिव्हीडंड जाहीर
Highlights:
- हॉकिन्स कुकर्स शेअर
- 100 रुपये लाभांश वाटप
- कंपनीची आर्थिक कामगिरी :
- मागील तिमाहीत 21.37 कोटी रुपये नफा
- शेअरची वाटचाल :
- 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी परतावा

Hawkins Cookers Share Price | ‘हॉकिन्स कुकर्स’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये लाभांश देणार आहे.
100 रुपये लाभांश वाटप
सेबीला दिलेल्या माहितीत हॉकिन्स कुकर्स कंपनीने कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची शिफारस केली आहे. हा प्रस्ताव सध्या शेअर धारकांच्या मान्यतेसाठी जारी करण्यात आला आहे.
लाभांश प्रस्ताव 9 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी मांडला जाईल. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीचे शेअर्स 0.092 टक्के घसरणीसह 6,380.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. यात कंपनीचे उत्पन्न 6.61 टक्के घसरणीसह 253.85 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 271.83 कोटी रुपये होते. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 22.80 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील तिमाहीत 21.37 कोटी रुपये नफा
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 21.37 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो या तिमाहीत 6.69 टक्के वाढला आहे. FY2022 मध्ये ‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीने 958 कोटी रुपये निव्वळ उत्पन्न कमावले होते, जे आर्थिक वर्ष 2023 मधे 1005.79 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
शेअरची वाटचाल :
4 नोव्हेंबर 2022 रोजी ‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीचे शेअर्स 6,572.75 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 4,932.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मे 2004 मध्ये ‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीचे शेअर्स फक्त 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 19 वर्षांच्या कालावधीत ‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 लाखाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी परतावा
ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 19 वर्षात 4 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. मार्च 2023 तिमाहीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 56.03 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर FII ने 0.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर DII ने 17.30 टक्के, आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 26.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hawkins Cookers Share Price today on 25 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
आपण हॉकिन्स कुकर्स शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.
कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. हॉकिन्स कुकर्सच्या शेअरची किंमत 25 मे 2023 रोजी ६३५० रुपये आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 25 मे 2023 पर्यंत हॉकिन्स कुकर्सचे मार्केट कॅप 3,377 कोटी रुपये आहे.
25 मे 2023 पर्यंत हॉकिन्स कुकर्सचे पीई आणि पीबी गुणोत्तर 36.165 आणि 15.83991 आहे.
हॉकिन्स कुकर्सच्या शेअरने त्या दिलेल्या कालावधीत (१ वर्षासारखा) व्यवहार केलेला ५२ आठवड्यांचा उच्चांकी/नीचांकी दर हा सर्वात जास्त आणि सर्वात नीचांकी दर आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. 25 मे 2023 रोजी हॉकिन्स कुकरची 52 आठवड्यांची उच्चांकी आणि नीचांकी किंमत 6,572.75 रुपये आणि 4,932.05 रुपये आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN