 
						Hot Stocks | भारत गीअर्सच्या शेअर्समध्ये मागील फक्त 5 दिवसात तब्बल 25 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ही ऑटो कंपोनंट कंपनी आपल्या भागधारकांना लवकरच बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी बोनस शेअर्स जाहीर करण्याची शिफारस करू शकते.
5 दिवसात या शेअर्समध्ये 25 टक्के वाढ :
ऑटो कंपोनेंट्स बनवणाऱ्या एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशन पासून कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 25 टक्के वाढ झाली आहे. भारत गियर्स लिमिटेड कंपनी आपल्या भागधारकांना लवकरच बोनस शेअर्स जाहीर करण्याची तयारी करत आहे. भारत गीअर्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत असे समजले आहे की 19 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत भागधारकांना बोनस शेअर्सची देण्याची शिफारस केली जाऊ शकते. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 110.62 रुपये असून कंपनीचे बाजार भांडवल 176 कोटी रुपये आहे.
गेल्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढ दाखवत आहेत, शेअरची किंमत 140 रुपयांवरून 182 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भारत गीअर्सचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 140 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 182 रुपयांपर्यंत वाढले आहेत. 11 ऑगस्ट 2022 रोजी भारत गीअर्सचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 141.20 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीचे शेअर्स 18 ऑगस्ट 2022 रोजी NSE वर 182 रुपयांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. सध्या या कंपनीचे शेअर 173.50 रुपयांच्या किमती वर व्यवहार करत आहेत. भारत गीअर्सच्या स्टॉकमध्ये मागील एका महिन्यात तब्बल 19 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मागील अडीच वर्षात जबरदस्त कामगिरी :
भारत गीअर्स लिमिटेडच्या शेअर्सने मागील अडीच वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. फक्त 29 महिन्यांत शेअर ची किंमत 170 रुपयांच्या पुढे गेली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 23 रुपयांवर ट्रेड करत होते, साष्या शेअर्स ची किंमत 170 रुपयेवर पोहोचली आहे. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर फक्त 22.99 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 18 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत NSE वर 173.50 रुपये वर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		