 
						HUDCO Share Price | हुडको कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन सुरू आहे. अशा काळात तुम्ही गुंतवणूक करताना सेक्टरला प्राधान्य न देता स्पेसिफिक स्टॉकला प्राधान्य दिले पाहिजे. मागील काही दिवसांपासून गृहनिर्माण क्षेत्रात मजबूत तेजी निर्माण झाली आहे. याचा फायदा हुडको स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणुकदारांना होत आहे. ( हुडको कंपनी अंश )
मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हुडको स्टॉक 16 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी हुडको स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 329.05 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हुडको कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 452 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 151 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 325.80 रुपये होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी अर्थसंकल्पात गृहनिर्माण क्षेत्रासाठी अनेक उपाययोजनांचा समावेश अपेक्षित आहे. यामुळे हुडको कंपनीला मजबूत फायदा होऊ शकतो.
आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार आयकर कायद्याच्या कलम 54EC अंतर्गत, जमीन आणि घर यांसारख्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून मिळणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर सूट देऊ शकते. यासह बॉण्ड्स विक्रीतून उभारला जाणाऱ्या निधीवर देखील आयकर सुट मिळू शकते. सध्या रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यासारख्या सरकारी कंपन्यांना बाँडद्वारे भांडवल उभारणीतून आयकर सूट देण्यात आली आहे. साधारणपणे आयकर कायद्यानुसार मालमत्तेच्या विक्रीतून प्राप्त झालेल्या उत्पन्नावर 20 टक्के एलटीजीटी आकारला जातो. आयकर कायद्याच्या कलम 54EC अंतर्गत दिलेली सूट करदात्यांना त्यांचे कर ओझे कमी करण्यास मदत करेल.
हुडको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 64,260.99 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 39 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. तर वर्ष-दर-वर्ष आधारावर हा स्टॉक 151 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 452 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत हा स्टॉक 811.5 टक्के वाढला आहे. चॉईस इक्विटी ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जर हुडको स्टॉक 340 रुपये किमतीवर क्लोज झाला तर शेअर अल्पावधीत 387 रुपये त्यांनतर 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		