
HUDCO Share Price | हुडको म्हणजेच हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24 जुलै रोजी 5 टक्के वाढीसह 313.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या बातमीनंतर हा स्टॉक मजबूत तेजीत आला होता. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी हुडको स्टॉक 2.89 टक्के वाढीसह 322.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
हुडको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 62,719 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 353.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 60.80 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. हुडको कंपनीने 24 जुलै रोजी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, त्यांनी राज्यातील गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांकरता आर्थिक सहाय्य देण्यासाठी राजस्थान सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे.
हुडको कंपनीने म्हटले आहे की या सामंजस्य करारा अंतर्गत राज्यातील गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी पुढील 5 वर्षांमध्ये 1,00,000 कोटी रुपयेचे आर्थिक सहाय्य प्रदान केला जाईल. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर कंपनीचे सीएमडी संजय कुलश्रेष्ठ आणि राजस्थान वित्त विभागाचे सचिव देबाशीष प्रुस्ती यांनी स्वाक्षरी केली.
नुकताच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने HUDCO स्टॉकला ‘मिडकॅप’ स्टॉक म्हणून वर्गीकृत केले आहे. आधी हा स्टॉक ‘स्मॉलकॅप’ म्हणून वर्गीकृत गेला होता. हा वर्गीकरणातील बदल ऑगस्ट 2024 पासून लागू केला जाईल. मिडकॅप स्टॉक म्हणून वर्गीकरण करण्याची मर्यादा 27600 कोटी रुपये आहे. 24 जुलै 2024 पर्यंत HUDCO कंपनीचे बाजार भांडवल 62,719.53 कोटी रुपये होते. हुडको ही सरकारी कंपनी परवडणारी घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणारी आणि भारतातील अनेक गृहनिर्माण आणि शहरी विकास प्रकल्पांना आर्थिक सहाय्य प्रदान करणारी कंपनी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.