 
						IDFC First Bank Share Price | ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ ने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खाजगी क्षेत्रातील ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ चे शेअर्स जबरदस्त वाढले होते. मंगळवारी हा स्टॉक आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक पातळीवर पोहचला होता. काल हा स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 65.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.55 टक्के वाढीसह 64.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी ‘IDFC फर्स्ट बँक’ च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. अल्पावधीत या बँकेचे शेअर्स 68 रुपये ते 70 रुपये पर्यंत वाढू शकतात. तज्ञांनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या स्टॉकवर 53 रुपये वर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आणि स्टॉकबाबत तज्ञांनी 80 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
मार्च 2023 च्या तिमाहीत IDFC फर्स्ट बँकेचा PAT 234 टक्क्यांच्या वाढीसह 803 कोटी रुपयेवर आला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत बँकेने 343 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत या बँकेने आतापर्यंतचा सर्वात जास्त तिमाही नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेने 2.437 कोटी रुपये विक्रिमी नफा कमावला होता. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीने 145 कोटी निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		