
IFCI Share Price | देशात एकापेक्षा जास्त सरकारी कंपन्या आहेत. यातील अनेक सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. तर अशा अनेक सरकारी कंपन्या आहेत, ज्यांचे दर सध्या ५० रुपयांपेक्षा कमी आहेत, पण या कंपन्यांचा परतावाही चांगला आहे.
खरे तर काँग्रेसच्या काळात उभारण्यात आलेल्या देशातील अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देतं आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊयात कोणत्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स ५० रुपयांपेक्षा स्वस्त आहेत.
आयएफसीआय ही सरकारी कंपनी आहे. कर्ज देण्याचे काम करते. या कंपनीचा परतावा पाहिला तर तो बराच चांगला आहे. सध्या या कंपनीत सरकारचा ७०.३ टक्के हिस्सा आहे. सध्या हा शेअरची किंमत 24 रुपये 40 पैसे आहे.
आयएफसीआय शेअरने दिलेला परतावा
* आयएफसीआयचा एक महिन्याचा परतावा ७०.०३ टक्के आहे.
* आयएफसीआयचा तीन महिन्यांचा परतावा ११२.१ टक्के आहे.
* १ जानेवारी २०२३ पासून आयएफसीआयचा परतावा ७६.८१ टक्के आहे.
* आयएफसीआयचा एक वर्षाचा परतावा १५६.८४ टक्के आहे.
* आयएफसीआयचा तीन वर्षांचा परतावा ३०३.३१ टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.