2 May 2025 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

गुजरातमधील ते बंदर अदानींच्या ताब्यातील | हजारो कोटींचं हेरॉईन जप्त झाल्यावर तुफान टीका | स्पष्टीकरणाची वेळ

Gautam Adani

गांधीनगर, २२ सप्टेंबर | गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो हेरॉईन पकडण्यात आली, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.

गुजरातमधील ते बंदर अदानींच्या ताब्यातील, हजारो कोटींचं हेरॉईन जप्त झाल्यावर तुफान टीका, स्पष्टीकरणाची वेळ – Illegal drugs at seized in Mundra Port of Gujarat Adani group issued media statement after malicious social media campaign against the Adani group :

डीआरआय आणि कस्टमचे ऑपरेशन गेल्या पाच दिवसांपासून सुरू होते. ही कारवाई झाल्यानंतर अधिकार्‍यांनी पुढील तपासणीसाठी माल पाठवल्याची माहिती आहे. तसेच, मुंद्रा बंदराव्यतिरिक्त गांधीधाम, मांडवी, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नईसह 5 इतर शहरांचा तपास करण्यात आला. या तपासात टेलकम पावडरच्या स्वरुपात करोडो किमतीची औषधे आयात केली जात असल्याची माहिती शोध यंत्रणेच्या लक्षात आली आहे.

दरम्यान, गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त झाल्याच्या प्रकरणात नवा खुलासा करण्यात आला आहे. या तस्करीशी कोणताही संबंध नाही, सोशल मीडियावर नाहक बदनामी केली जात आहे, असं स्पष्टीकरण अदानी ग्रुपच्या अधिकृत ट्विटर अकाऊण्टवरुन रात्री उशिरा परिपत्रक जारी करत देण्यात आलं आहे.

अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण काय?
16 सप्टेंबर रोजी डीआरआय आणि कस्टम्स विभागाने अफगाणिस्तानातून आलेल्या दोन कंटेनरमधून मुंद्रा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर (एमआयसीटी) मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला. अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि आरोपींची धरपकड केल्याप्रकरणी आम्ही डीआरआयचे अभिनंदन करतो.

डीआरआय आणि कस्टम्स विभागाला सरकारने बेकायदेशीर कार्गो उघडून तपासणी करण्याचे अधिकारी दिले आहेत. मात्र देशभरातील कुठलाही पोर्ट ऑपरेटर कंटेनरची तपासणी करु शकत नाही, असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. अदानी ग्रुपविरोधातील सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या आणि बदनामीकारक चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो. आमच्या कुठल्याही पोर्टवर उतरणाऱ्या कार्गोची तपासणी करण्याचे आमचे धोरण नाही, असंही अदानी ग्रुपने स्पष्ट केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Illegal drugs at seized in Mundra Port of Gujarat Adani group issued media statement after malicious social media campaign against the Adani group.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GautamAdani(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या