30 April 2025 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

भारतीय अर्थव्यवस्था 2011 मध्येच जगात तिसऱ्या क्रमांकावर होती हे वर्ल्ड बँकेने म्हटलेले, केंद्राच्या वेबसाईटवर 2014 पासून माहिती

Indian Economy

Indian Economy | कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना केल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था सुधारत आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या रिसर्च रिपोर्ट इकोरॅपमध्ये म्हटले आहे की, 2029 मध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा टॅग मिळण्याची शक्यता आहे. २०१४ पासून ते ७ स्थानांवर जाईल. 2014 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची क्रमवारी 10 व्या क्रमांकावर होती.

Q1 मध्ये GDP विकास दर 13.5% पर्यंत मंदावला :
चालू आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर १३.५ टक्के होता, असे एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालात म्हटले आहे. हीच गती कायम राहिली तर भारतीय अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल.

भारतासाठी ६% ते ६.५% वाढ ‘न्यू नॉर्मल’ :
आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा जीडीपी विकास दर सध्या 6.7 टक्के ते 7.7 टक्के इतका आहे. “जगातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, आमचा विश्वास आहे की ६ टक्के ते ६.५ टक्के वाढ ही भारतासाठी ‘न्यू नॉर्मल’ आहे असं म्हटलं आहे.

भारत ब्रिटनला मागे, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली :
तर दुसरीकडे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचं म्हटलं आहे. यासह ब्रिटनची 6 व्या स्थानावर घसरण झाली आहे. एक दशकापूर्वी भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या स्थानावर होता, तर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर होता.

पण अर्थव्यवस्थेची अधोगती होतेय असं नाही वाटत का?
होय, कारण भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं जागतिक बँकेने म्हणाले होते. या संदर्भात ‘द हिंदू’ने सविस्तर वृत्त २३ मे २०१३ मध्ये प्रसिद्ध केले होते. ते सविस्तर वृत्त तुम्ही येथे क्लिक करून पाहू शकता.

केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर सुद्धा माहिती :
विशेष म्हणजे याच वृत्ताबद्दल केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर सुद्धा 30 एप्रिल 2014 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तुम्ही येथे क्लिक करून त्यासंदर्भात माहिती केंद्र सरकारच्या वेबसाईटवर वाचू शकता.

यावर एक फॅक्ट चेक रिपोर्ट २०१८ मध्येच करण्यात आला होता :
याबाबत फॅक्ट चेक रिपोर्ट २०१८ मध्येच प्रसिद्ध करण्यात आला होता आणि तोसुद्धा तुम्ही येथे वाचू शकता. त्यामुळे एकूण एसबीआयवर कोणाचा दाबाव आहे असं नेटिझन्स विचारू लागले आहेत. तो रिपोर्ट येथे वाचू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: India became third largest economy in 2011 said World Bank check details 04 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Economy(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या