15 December 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

विरोधकांना संसदेत बोलू दिलं जातं नाही, प्रसार माध्यमं मोदींसाठी काम करतात, जनतेला वास्तव समजेल तरी कसं? - राहुल गांधीचा थेट हल्ला

Congress Rally in Ramlila Maidan

Congress Rally in Ramlila Maidan | दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भाववाढीवरून आंदोलन करत आहेत. या दरम्यान काँग्रेस एका रॅलीचंही आयोजन करत असून त्याला राहुल गांधी यांनी संबोधित केलं आहे. यावेळी अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खर्गे, सचिन पायलट, कमलनाथ, आराधना मिश्रा, कुमारी शैलजा, भूपेश बघेल असे अनेक बडे नेते उपस्थित होते.

संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जातो :
राहुल गांधी म्हणाले की, सरकारने आमच्यासाठी मार्ग बंद केला आहे. संसदेचा मार्ग बंद केला. संसदेत विरोधकांचे माइक बंद केले जातात, आम्हाला बोलू दिलं जात नाही. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्थेवर दबाव आहे आणि प्रसार माध्यमं मोदींसाठी काम करतात जी अदानी आणि अंबानींच्या हातात गेली आहेत. म्हणूनच लोकांमध्ये जाऊन देशाला सत्य जनतेसमोर सांगावे लागते.

देश त्रस्त आहे, काँग्रेसच देशाला वाचवू शकते :
राहुल गांधी कृषी कायद्यांसाठी म्हणाले की, हे तिन्ही कायदे उद्योगपतींसाठी आणले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या ताकदीमुळे हे कायदे मागे घ्यावे लागले. भारतातील सामान्य नागरिक अडचणीत आहेत, देश त्रस्त आहे. ७० वर्षांत काँग्रेसने एवढी महागाई कधीच दाखवली नाही. काँग्रेसच देशाला वाचवू शकते.

‘मी ईडीला घाबरत नाही, 55 तास नाही, 5 दिवस किंवा 5 वर्षे बसून चौकशी करा’
राहुल गांधी म्हणाले की, देशातील लोक आणि नेत्यांना एजन्सींकडून धमकावले जात आहे. “ईडीने माझी 55 तास चौकशी केली, पण काहीही समोर आलेलं नाही. 55 तास नाही तर पाच दिवस बसून पाच वर्षे चौकशी करा, मी घाबरणार नाही, असे ते म्हणाले.

दोन उद्योगपतीं’ना टोला, म्हणाले संपूर्ण देशावर नियंत्रण :
या रॅलीला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, केवळ दोनच उद्योगपती सरकारचा पुरेपूर फायदा घेत आहेत. प्रसारमाध्यमे देशातील जनतेला घाबरवतात. तेल, विमानतळ, मोबाइल हे संपूर्ण क्षेत्र या दोन उद्योगपतींना दिले जात आहे. सरकारवरही त्यांचे नियंत्रण आहे.

काही लोक देशात द्वेष निर्माण करत आहेत :
रॅलीच्या सुरुवातीलाच राहुल गांधी म्हणाले की, देशात द्वेष पसरवला जात आहे. द्वेष पसरवला जात आहे कारण काही लोकांना त्यांच्या भविष्याची भीती वाटते. ते म्हणाले की, भारतातील दोन उद्योगपती द्वेष आणि भीतीचा फायदा घेत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Congress Rally in Ramlila Maidan over inflation and unemployment in India check details 04 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x