Indian Hotels Share Price | टाटा गृपचा शेअर झटपट देईल 21% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला

Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्सचे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21 टक्क्यांनी वाढू शकतो. 2024 या वर्षात इंडियन हॉटेल्स स्टॉक 30 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी इंडियन हॉटेल्स स्टॉक 0.69 टक्के वाढीसह 587.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 640 रुपये किमतीवर जाऊ शकतात. 5 जून 2024 रोजी इंडियन हॉटेल्स स्टॉक 529 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 20-21 टक्क्यांनी वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील 5 वर्षात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 290 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 3 वर्षात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 330 टक्के वाढवले आहेत. मागील 2 वर्षात या कंपनीचे शेअर्स 145 टक्के मजबूत झाले होते. मागील एका वर्षात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे.
पर्यटन आणि हॉटेल सेक्टरमधील उद्योगाचा फायदा इंडियन हॉटेल्स कंपनीला होत आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या महसूल संकलनात 16.5 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा EBITDA 19.5 टक्के वाढला आहे. 2024-25 मध्ये देखील कंपनीच्या उत्पन्नात मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. 2024-28 मध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीच्या पाइपलाइनमध्ये 12,953 हॉटेल रूम्स आहे. तर मार्च 2024 पर्यंत इंडियन हॉटेल्स कंपनीचे 24,136 रूम्स ऑपरेशनल होते.
ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स कंपनीबाबत 2024-27 दरम्यानचे अंदाज जारी केले आहे. आर्थिक वर्ष 2024-27 दरम्यान इंडियन हॉटेल्स कंपनीचा महसूल आणि EBITDA अनुक्रमे 14 टक्के आणि 18 टक्के वाढू शकतो. या कालावधीत कंपनीचा EBITDA सरासरी वार्षिक आधारे 8-10 टक्के दराने वाढू शकतो. नवीन हॉटेल्स सुरू झाल्यावर कंपनीच्या महसुलात वाढ पाहायला मिळेल, याबाबत तज्ञांना खात्री आहे. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Indian Hotels Share Price NSE Live 07 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC