30 April 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअर्स तुफान तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Indian Hotels Share Price

Indian Hotels Share Price | फेब्रूवारी महिन्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात चांगले शेअर्स शोधण्याची लगबग सुरू झाली आहे. सोमवारी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किंचित घसरले होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी बजेट काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. तज्ञांनी हा स्टॉक किमान 1 वर्षासाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 493.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तज्ञांनी आपल्या बजेट पिक स्टॉकमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सची निवड केली आहे. तज्ञांच्या मते, पुढील महिन्यात सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारत सरकारचा अधिक भर प्रवास सेवा आणि पर्यटनावर असेल. भारतातील सर्वात मोठा हॉटेल ब्रँड ताज हा इंडियन हॉटेल्स कंपनीचा भाग आहे. या कंपनीचे अन्य ब्रॅण्ड सिलेक्शन, विवांता, हे आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या 270 मालमत्तांमध्ये कंपनीकडे 33000 रूम्स आहेत. पुढील 3 महिन्यांत ही कंपनी 15 नवीन हॉटेल्स लॉन्च करण्याची शक्यता आहे.

इंडियन हॉटेल ही कंपनी टाटा समूहाचा भाग असलेली कर्जमुक्त कंपनी आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचे नेट डेट टू एबिटा प्रमाण 0.5 आहे. कंपनीची महसूल वाढ सरासरी वार्षिक 15 टक्के आणि EBITDA सरासरी वार्षिक प्रमाण 20 टक्के आहे.

तज्ञांनी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 575 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 474 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Share Price NSE Live 30 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Hotels Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या