2 May 2025 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY

Infosys Share Price

Infosys Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी इन्फोसिस लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात ११.४६ टक्क्यांची वाढ होऊन तो ६,८०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीने ६,१०६ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

तसेच डिसेंबर तिमाहीत इन्फोसिस कंपनीचे परिचालन उत्पन्नात ७.५८ टक्क्यांची वाढ होऊन तो ४१,७६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत ३८,८२१ कोटी रुपये होते. इन्फोसिस कंपनीची एकूण कर्मचारी संख्या ३,२३,३७९ वर पोहिचली असून त्यात ५,५९१ कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.

इन्फोसिस शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी इन्फोसिस लिमिटेड शेअर 1.52 टक्क्यांनी घसरून 1,920.05 रुपयांवर पोहोचला होता. इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 2,006.45 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 1,358.35 रुपये होती. इन्फोसिस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 8,00,683 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

इन्फोसिस शेअर टार्गेट प्राईस

दरम्यान, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या घसरणीचा इन्फोसिस शेअरवर विशेष परिणाम झालेला नाही. 100 आणि 50 दिवसांच्या एसएमए’ने गेल्या 10 दिवसांत भक्कम सपोर्ट दिला आहे, तर शॉर्ट टर्ममध्ये इन्फोसिस कंपनी शेअरने 10 दिवसांच्या एसएमएपेक्षा अधिक मजबूत सपोर्ट प्रस्थापित केला आहे, ज्यामुळे सध्याच्या पातळीवरून शेअरमध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस शेअर 1,940 ते 1,950 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी 2,100 रुपये टार्गेट प्राईस सह 1,880 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Infosys Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या