
Investment Scheme | तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी कोणतीही जादू होणार नाही, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, आणि तुमचे ध्येय निश्चित करावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुक करावी लागेल. गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नाही. तुम्ही लहान रकमेने सुद्धा गुंतवणूक करू शकता.
करोडपती कसे व्हावे:
गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला थोड्या पैशांची आवश्यकता लागेल. फक्त योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणूक करूनच तुम्ही करोडपती होऊ शकता. समजा तुम्ही नुकतेच तुमचे करिअर सुरू केले आहे आणि तुमचे वय 20 वर्षे आहे. विसाव्या वर्षापासून तुम्ही फक्त 200 रुपये रोज बचत करून जबरदस्त परतावा मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला मासिक 6000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. कोणीही रातोरात करोडपती होत नाही, या साठी तुम्हाला गुंतवणुकीचे ध्येय दीर्घकालीन ठेवावे लागेल. दीर्घ मुदतीत तुम्हाला जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे.
जर एखादा गुंतवणूकदार दररोज फक्त 200 रुपये बचत करत असेल, तर एका महिन्यात तो व्यक्ती 6000 रुपये बचत करेल. आणि एका वर्षात त्याची बचत 72,000 रुपये होईल. आता जर तुम्ही हे 72000 रुपये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सारख्या सरकारी हमी योजनेत गुंतवले तर तुम्हाला दीर्घ काळात जबरदस्त परतावा मिळेल. तुमचे गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारा व्याज परतावा आणि मॅच्युरिटीवर मिळालेली संपूर्ण रक्कम त्या वर कोणताही कर आकारला जात नाही. तुम्ही पीपीएफमध्ये दर महिना 6000 रुपये गुंतवल्यास तुमची गुंतवणूक एका वर्षात 72,000 रुपये होईल. नियमितपणे गुंतवणूक केल्यास ही रक्कम 15 वर्षांच्या कालावधीत 19 लाख 52 हजार 740 रुपये होईल.त्यावर तुम्हाला 7.1 टक्के चक्रवाढ दराने व्याज परतावाही मिळेल. PPF चा किमान परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे.
जर तुम्ही 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर :
ही रक्कम तुम्ही PPF मध्ये 20 वर्षे जमा करत राहिल्यास एकूण 31 लाख 95 हजार 978 लाख रुपये जमा होईल. आता ती आणखी 5 वर्षे वाढवली तर 49 लाख 47 हजार 847 रुपये वाढतील. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की PPF ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. परंतु, दर तीन महिन्यांनी त्याचा व्याजदर निश्चित केला जातो. येथे सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरानुसार गणना केली तर तुम्हाला मिळणारा परतावा हा करोडोमध्ये असेल.
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये महिन्याला 6000 रुपये गुंतवले तर :
जर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये 25 वर्षांसाठी दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 लाख 27 हजार 342 रुपये होईल. येथे जे 10 टक्के वार्षिक परताव्याच्या आधारावर गणना केली आणि तुम्ही ती गुंतवणूक पुढे पाच वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला मिळणारा परतावा 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये पेक्षा जास्त होईल. परंतु, तज्ञांच्या मते 10 टक्के परतावा अतिशय सामान्य आहे.
2 कोटी परतावा कसा मिळेल?
डायव्हर्सिफाइड म्युचुअल फंडांत गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा मिळणे सामान्य बाब आहे. या दरानुसार 25 वर्षांत ही रक्कम 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये सहज होऊ शकते. आणि पुढील 30 वर्षांत ही रक्कम वाढून 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.