27 July 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

Money Making Stock | मोठे संकेत! या कंपनीचे प्रमोटर्स स्वतःच शेअर्स खरेदी करत आहेत, स्टॉक भविष्यात करोडपती करणार, खरेदी करणार?

Money Making Stock

Money Making Stock | मिष्टान फूड लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून या कंपनीच्या प्रमोटर्सनी कंपनीत आपला हिस्सा आणखी वाढवला आहे. BSE इंडेक्सच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार , कंपनीचे प्रमोटर आणि संचालक हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांनी खुल्या बाजारातून आपल्या मिष्टान फूड लिमिटेड या कंपनीचे 2 लाख शेअर्स विकत घेतले आहेत.

15 नोव्हेंबर 2022 रोजी मिष्टान्न फूड लिमिटेड कंपनीचे संचालक आणि प्रमोटर हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांनी आपल्या कंपनीचे 18,18,032 शेअर्स 9.09 रुपये प्रति इक्विटी शेअर या दराने विकत घेतले आहेत. याचा अर्थ असा की या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालकाने हे शेअर्स सरासरी 9.09 प्रति इक्विटी शेअर या दराने आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडून कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील अनेक वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे.

हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांनी खुल्या बाजारातून स्टॉक खरेदी केल्यावर कंपनीतील त्यांची शेअरहोल्डिंग आता 0.02 टक्के वाढली आहे. या कंपनीचे अतिरिक्त 2 लाख शेअर्स खरेदी केल्यामुळे हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांच्या गुंतवणूकीचा वाटा कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 49.30 टक्के झाला आहे. खुल्या बाजारतून नवीन स्टॉक संपादन करण्यापूर्वी हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांची कंपनीत एकूण 49.28 टक्के गुंतवणूक होती. आता कंपनीचे 2 लाख नवीन शेअर्स घेऊन पटेल यांनी आपल्या शेअरहोल्डिंगमध्ये 0.02 टक्क्यांची वाढ केली आहे.

Misthann Foods शेअर्सचा इतिहास :
जानेवारी 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकींग सुरू केली होती. त्यामुळे स्टॉकमध्ये काही प्रमाणात पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या स्टॉकने कोविड नंतरच्या रॅलीमध्ये सुमारे 2.50 प्रति शेअर या किमतीवरून 9 प्रति शेअर किमतीवर उडी मारली आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील 30 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना आणि गुंतवणूकदारांना 250 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील चार वर्षांत हा स्टॉक 1.50 रुपये किमतीवरून 9 रुपये प्रति शेअर या किमतीवर पोहचला आहे. या दरम्यान कंपनीच्या गुंतवणूकदारानी जवळपास 500 टक्के नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Stock of Mishtann Foods limited Share price return on investment on 17 November 2022.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x