23 March 2023 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

Sarkari Shares | सरकारी बँकेतील एफडी पेक्षा हा सरकारी शेअर खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा प्लस मल्टिबॅगर लाभांश सुद्धा मिळतो, नाव नोट करा

Sarkari Shares

Sarkari Shares | 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायूचे उत्पादन घेणाऱ्या ONGC कंपनीचा निव्वळ नफा 30 टक्क्यांनी कमी झाला असून तो 12,825.99 कोटी रुपयांवर आला आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने कंपनीने मंगळवारी एक निवेदन जरी करून म्हटले आहे की, गेल्या वर्षी वर्षापूर्वी याच तिमाहीत ONGC कंपनीने 18,347.73 कोटी रुपये निव्वळ नफा संकलित केला होता. यावर्षी तिमाही निकालांसोबतच कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांशही देण्याचे जाहीर केले आहे. आज ONGC कंपनीचे शेअर्स 2.51 टक्क्यांच्या वाढीसह 142 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. BSE 500312 | ONGC Share Price | ONGC Stock Price

कंपनीने 135 टक्के लाभांश जाहीर केला :
ONGC कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 135 टक्के अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांश देण्याची रेकॉर्ड तारीख 22 नोव्हेंबर 2022 असेल असे कंपनीने जाहीर केले आहे. ONGC कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने ठरवले आहे की 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति शेअरवर 6.75 रुपये लाभांश देण्यात येईल. हा लाभांश कंपनी 13 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल.

त्याच वेळी एप्रिल-जून 2022 तिमाहीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत ONGC कंपनीच्या निव्वळ नफ्यात 15.6 टक्क्यांची घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 15,205.85 कोटी रुपये नफा कमावला होता. 1 जुलै 2022 पासून देशांतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवर विंडफॉल टॅक्स लागू झाला आणि त्यामुळे ओएनजीसी कंपनीच्या तिमाही नफ्यात घट पाहायला मिळाली आहे. या विंडफॉल टॅक्स लागू केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेल आणि वायूच्या किमतीत झालेल्या वाढीचा फायदा ONGC कंपनीला घेता आला नाही.

विंडफॉल टॅक्स लागू केल्याचा परिणाम असा झाला की, ONGC कंपनीचा आयकर दर पूर्वी 22 टक्के होता जो आता 30 टक्क्यांवर आला आहे. यावर वेगळा अधिभार आणि उपकरही लावण्यात आला आहे. ONGC कंपनी आंतरराष्ट्रीय मानकाचे पालन करून कच्च्या तेलाची विक्री करते जे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादन तयार करण्यासाठी तेल शुद्धीकरण कारखान्यात शुद्ध केले जातात. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ONGC कंपनीच्या तेल आणि वायू उत्पादनात दोन टक्क्यांची घसरण झाली होती. आता कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 8,492 कोटी रुपये अंतरिम लाभांश म्हणून वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि यातील एक मोठा हिस्सा भारत सरकारकडे जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Shares Dividend has Announced by ONGC company to its existing Share holders on 20 November 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x