
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंडिजेन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इंडिजेन कंपनीला कार्लाइल गृप आणि नादाथूर फार ईस्ट या खाजगी इक्विटी फर्मचा आर्थिक पाठिंबा आहे. ( इंडिजेन कंपनी अंश )
या कंपनीचा IPO 6 मे 2024 ते 8 मे 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. इंडिजेन कंपनीच्या IPO चा आकार 760 कोटी रुपये आहे. या IPO मध्ये 2.39 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहे.
इंडिजेन कंपनीचे शेअर्स 9 मे 2024 रोजी गुंतवणुकदारांना वाटप केले जातील. आणि 13 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स मुख्य स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केले जातील. या कंपनीच्या IPO शेअर्सची प्राइस बँड अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. इंडिजेन कंपनीचा IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये 160 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. Infosys कंपनीचे सह-संस्थापक नदाथुर एस राघवन यांच्या Nadathur FarEast Pte Ltd कंपनीने इंडिजेन कंपनीचे 23.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
इंडिजेन कंपनीने आपल्या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल ॲडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना नियुक्त केले आहे. तर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
इंडिजेन कंपनीची स्थापना 1998 साली झाली होती. या कंपनीचा व्यवसाय अमेरिका, ब्रिटन, युरोप, चीन, जपान आणि भारतात विस्तारलेला आहे. मागील आर्थिक वर्षात इंडिजेन कंपनीच्या महसूल संकलनात 39.85 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर कंपनीचा PAT 63.43 टक्क्यांनी वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.