
IPO GMP | डेंटल प्रॉडक्ट्स फर्म लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ १३ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्यापूर्वीच ग्रे-मार्केटमध्ये आयपीओ शेअर तुफान तेजीत आहे.
लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओ प्राईस बँड
लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी कंपनीने ४०७ ते ४२८ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 33 शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14,124 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये ७५ टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखीव असेल. तसेच १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १० टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.
आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये तेजीत
अनलिस्टेड मार्केटसंबधित तज्ज्ञांनी दिलेल्या अपडेटनुसार, ‘अनलिस्टेड मार्केटमध्ये लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर जीएमपी 163 रुपये आहे, जो प्राईस बँड पेक्षा टक्क्यांनी अधिक आहे. ताज्या अपडेटनुसार, 8 जानेवारी २०२५ रोजी जीएमपी 155 रुपये होता. तर 9 जानेवारी २०२४ ला GMP 165 रुपयांवर पोहोचला होता. मजबूत जीएमपीमुळे या आयपीला मोठा प्रतिसाद मिळू शकतो असे संकेत मिळत आहेत.
आयपीओमधून मिळणारा निधी कुठे खर्च करणार
लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओमार्फत मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी आणि उपकंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी, नवीन मशिनरी खरेदी करण्यासाठी, उपकंपनी बिझडेंट डिव्हाइसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी करणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.