
IPO GMP | जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ १० डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना १२ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ६८ ते ७२ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. जंगल कॅम्प्स इंडिया आयपीओमध्ये प्रत्येकी १० रुपये फेस व्हॅल्यूच्या ४०,८६,४०० नवीन शेअर्सचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी 104% परतावा मिळू शकतो
इन्वेस्टरगेन डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार, जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये 75 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करतोय. याचा अर्थ हा आयपीओ शेअर १४७ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशी कमीतकमी १०४% परतावा मिळू शकतो. जंगल कॅम्प्स इंडिया कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध केले जातील.
आयपीओच्या मार्फत 29.42 कोटी रुपयाचा निधी उभारणार
जंगल कॅम्प्स इंडिया कंपनी आयपीओच्या मार्फत 29.42 कोटी रुपयाचा निधी उभारणार आहे. त्यानंतर जमा झालेला निधी कंपनी आपल्या विस्तार योजनांसाठी वापरणार आहे. आयपीओ’च्या मार्फत जमा होणाऱ्या निधीपैकी ७ कोटी रुपये मध्य प्रदेशातील संजय डुबरी राष्ट्रीय उद्यानातील नव्या प्रकल्पाच्या विकासासाठी वापरले जाणार आहेत. तसेच मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यानात असलेल्या पेंच जंगल कॅम्प या रिसॉर्टच्या नूतनीकरणासाठी ३.५ कोटी रुपये वापरले जाणार आहेत.
आयपीओच्या मार्फत उभारलेल्या 29.42 कोटी रुपयांच्या निधीतील ११.५ कोटी रुपये उत्तर प्रदेशातील मथुरा येथे फोर स्टार हॉटेल विकसित करण्यासाठी कंपनी आपली उपकंपनी मधुबन हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ११.५ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. त्यानंतर जमा होणाऱ्या एकूण निधीतील उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरला जाणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.