
IPO GMP | आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच आणखी एक बहुप्रतीक्षित आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ १९ नोव्हेंबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ मध्ये गुंतवणुकीची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर असेल.
आयपीओ शेअर प्राईस बँड
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी १०२ ते १०८ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदार एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ इश्यूसाठी एकूण १३८ शेअर्स आणि त्यातील गुणाकारांमध्ये बोली लावू शकतात. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ १०,००० कोटी रुपयांचा आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये सध्या 9 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे.
काय आहे सविस्तर
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा १०,००० कोटी रुपयांचा आयपीओ पूर्णपणे इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू असेल आणि त्यात ‘OFS’ घटक नसेल. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ पैकी ७५% हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, तर १५% हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच या आयपीओतील १०% रक्कम किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. तर कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी 200 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव ठेवण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 5 रुपयांची सूट देखील मिळू शकते. विशेष म्हणजे शेअरहोल्डर कोट्याअंतर्गत एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांसाठी १००० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव ठेवण्यात येणार आहेत.
कंपनी व्यवसाय
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी ही एनटीपीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी युटिलिटी स्केल अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा पोर्टफोलिओ विकसित करण्यात गुंतलेली कंपनी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.