3 May 2025 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी चालून आली आहे. या आठवड्यात 5 कंपन्याचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या 5 कंपन्यांच्या आयपीओची डिटेल्स खाली देण्यात आली आहे. प्राईस बँड सहित सर्व डिटेल्स जाणून घ्या.

CapitalNumbers Infotech Limited IPO

कॅपिटलनंबर इन्फोटेक लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून १६९.३७ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओद्वारे कॅपिटलनंबर इन्फोटेक लिमिटेड कंपनी ३२.२० लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. तसेच ऑफर फॉल सेल अंतर्गत ३२.२० लाख शेअर्स जारी केले जाणार आहेत.

कॅपिटलनंबर इन्फोटेक लिमिटेड कंपनी आयपीओसाठी २० जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत बोली लावता येणार आहे. या आयपीओसाठी कॅपिटलनंबर इन्फोटेक लिमिटेड कंपनीने २५० ते २६३ रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. या कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये ११० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

Rexpro Enterprises IPO

रेक्सप्रो एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी आयपीओ २२ जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ २४ जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. रेक्सप्रो एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने या आयपीओसाठी १४५ रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना रेक्सप्रो एंटरप्रायझेस कंपनी आयपीओच्या एका लॉटमध्ये १००० शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४५००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

CLN Energy IPO

सीएलएन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ २३ जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना २७ जानेवारीपर्यंत बोली लावता येणार आहे. सीएलएन एनर्जी लिमिटेड कंपनीने या आयपीओसाठी २३५ ते २५० रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना सीएलएन एनर्जी कंपनीच्या एका लॉट मध्ये ६०० शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना १.५० लाख रुपये गुंतवावे लागतील.

GB Logistics IPO

जीबी लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनी हा एसएमई आयपीओ २४ जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओ’साठी गुंतवणूकदारांना २८ जानेवारीपर्यंत बोली लावता येणार आहे. जीबी लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीने अद्याप प्राईस बँड निश्चित केलेली नाही. या आयपीओ मार्फत जीबी लॉजिस्टिक्स कंपनी २४.५८ लाख शेअर्स जारी करणार आहे.

Denta Water IPO

डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी हा मेनबोर्ड आयपीओ २२ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. डेंटा वॉटर लिमिटेड कंपनीने या आयपीओ शेअरसाठी २७९ ते २९० रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओच्या एका लॉटमध्ये ५० शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४,७०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये ११० रुपयांवर ट्रेड करत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP Saturday 18 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या