
IPO Investment | Baheti Recycling Industries कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे. Baheti Recycling Industries कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई एक्स्चेंजवर सूचीबद्ध होतील. या कंपनीच्या IPO चा आकार 12.42 कोटी रुपये असून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 435.65 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. Baheti Recycling Industries कंपनीचा IPO 347.53 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिल्यानंतर या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये अप्रतिम किमतीवर पोहचले आहेत.
Baheti Recycling Industries कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 34 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या तुलनेत या कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 2 रुपयांनी वाढली आहे. Baheti Recycling Industries कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 32 रुपये प्रीमियमवर पोहचला आहे. शेअर बाजारातील तज्ञांचे मत आहे की, गुंतवणूकदारांकडून या IPO स्टॉकला बंपर प्रतिसाद मिळाल्यामुळे ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक तेजीत धावत सुटला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, दलाल स्ट्रीटवर गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक असल्यामुळे हा स्टॉक देखील तेजीत आला आहे. पुढील काही दिवसात NSE निफ्टी 19000 ची पातळी स्पर्श करेल, असे चित्र दिसत आहे.
एका आठवड्यात GMP 8 रू वरून 34 रु वर : Baheti Recycling Industries कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये एका आठवड्यापूर्वी 8 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता 34 रुपयांवर पोहचला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स जबरदस्त प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होतील. कंपनीच्या शेअर्सची IPO इश्यू किंमत 45 रुपये प्रति शेअर आहे. जर या कंपनीच्या शेअर्सची किंमत ग्रे मार्केटमध्ये 34 रुपये प्रीमियमवर गेली तर या कंपनीचे शेअर्स 79 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतात. कंपनीचे शेअर्स सुमारे 75 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 8 डिसेंबर 2022 रोजी Baheti Recycling Industries कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध होतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.