
IPO investment | सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. पण IPO बाजारात येण्या आधीच या कंपनीच्या शेअर्सनी ग्रे मार्केटमध्ये जोरदार धमाका केला आहे. विचार करा, IPO येण्या आधीच जी हा स्टॉक असा वाढत असेल तर IPO आल्यावर तर ढगात जाईल हे नक्की. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 48 रुपये प्रीमियम पर्यंत गेली आहे. गुरुवारच्या तुलनेत शेअरच्या किमतीत 12 रुपयांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर शेअर बाजारात एक नवीन आयपीओ येत आहे.
हा IPO आहे सिरमा एसजीएसचा. 12 ऑगस्ट रोजी सिरमा SGS च्या IPO वर बोली सुरू झाली आणि 18 ऑगस्ट रोजी बंद झाली. 840 कोटी रुपयांच्या या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हा IPO तब्बल 32.61 पट सबस्क्राइब झाला आहे. या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 5.53 पट आहे. सिरमा एसजीएसचा आयपीओ ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त प्रदर्शन करता आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या IPO साठी 48 रुपयांपर्यंत प्रीमियम बोली लागली आहे.
ग्रे मार्केट प्रीमियम किंमत :
ह्या स्टॉक ची ग्रे मार्केट मध्ये बोली 20 रुपये प्रीमियम पासून सुरू झाली होती ती आता 48 रुपयांपर्यंत वाढली आहे. गुरुवारी ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत 36 रुपये प्रति शेअर एवढी झाली होती. कंपनीच्या आयपीओचा प्रीमियम शुक्रवारी तब्बल 12 रुपयांनी वाढला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की दुय्यम बाजारातील वाढती मागणी आणि बराच काळ लोकांनी IPO साठी प्रतीक्षा केली आहे, त्याची ही उत्सुकता असून ग्रे मार्केटमध्ये सिरमा एसजीएसची प्रीमियम किंमत सतत वाढत आहे. ग्रे मार्केटमध्ये सिरमा एसजीएसची प्रीमियम किंमत सध्या 20 रुपयांवरून 48 रुपयांपर्यंत वाढली आहे.
जबरदस्त ओपनिंग :
शेअर मार्केटमध्ये ह्या IPO ची जबरदस्त ओपनिंग होणार हे नक्की. शकते मार्केट वॉचर्सचे म्हणणे आहे की सिरमा SGS च्या शेअर्सची लिस्टिंग धमाकेदार प्रीमियमवर होईल. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत 48 रुपये झाली आहे. जर कंपनीचे शेअर्स 220 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडवर वितरीत केले गेले, तर कंपनीचे शेअर्स 268 रुपयांच्या किमतीवर बाजारात लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स प्राइस बँडपेक्षा सुमारे 22 टक्के अधिक जास्त किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. सिरमा SGS च्या IPO च्या वाटपाची तारीख 23 ऑगस्ट 2022 आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.