14 December 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

IPO Investment | मार्ग श्रीमंतीचा! या IPO ने 5-6 महिन्यातच 591% पर्यंत परतावा दिला, स्टॉक आता खरेदी करावे का?

IPO Investment

IPO Investment | IPO च्या दृष्टीने 2022 हे वर्ष निराशाजनक राहिले होते. 2022 यावर्षी एकूण 93 कंपन्यांनी 57,000 कोटी रुपये भांडवल उभारणीसाठी आपले IPO लॉन्च केले होते. तथापि यापैकी फक्त 6 IPO स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंग किंमतीपासून 590 टक्के वधारले आहेत. चला तर मग 2022 मधील टॉप 5 परफॉर्मिंग IPO स्टॉकबद्दल जाणून घेऊ.

1) Rhetan TMT Ltd :
या कंपनीचे शेअर्स 5 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग 70 रुपये किमतीवर झाली होती. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 493.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी 591 टक्के परतावा कमावला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 11 : 4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. तर कंपनी 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे व्यापार करणारी कंपनी ISI मानक TMT बारच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे.

2) जयंत इन्फ्राटेक लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स 13 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक 76 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता, जो आज 1 मार्च 2023 रोजी 5.79 टक्के वाढीसह 130.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या स्टॉकने लिस्टिंगपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 403 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने जानेवारी 2023 मध्ये आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस वाटप करण्याची घोषणा केली होती. जयंत इन्फ्राटेक कंपनी नवीन आणि विद्यमान रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्याच्या कामात गुंतलेली आहे.

3 ) वीरकृपा ज्वेलर्स लिमिटेड :
या कंपनीचा IPO स्टॉक 18 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या वेळी या कंपनीच्या शेअरची किंमत 27 रुपये होती, जे आज 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 112.55 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंग झाल्यापासून आतपर्यंत 278 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही एक SME गटातील सूचीबद्ध स्मॉलकॅप ज्वेलरी कंपनी आहे. कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. यासोबतच कंपनीने 1:10 या प्रमाणत इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला आहे. वीरकृपा ज्वेलर्स ही कंपनी मुख्यतः चांदी, सोने, जडित आणि हिरे, प्लॅटिनम आणि इतर मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान दगडांपासून तयार केल्या जाणाऱ्या दागिन्यांच्या उत्पादन आणि विक्री व्यवसायात गुंतलेली आहे.

4) Contain Technologies Limited :
या कंपनीचे शेअर्स 30 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीचे शेअर्स 22 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आज बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 70.50 रुपये किमतीेवर क्लोज झाले आहेत. लिस्टिंग नंतर हा स्टॉक 220 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.

5) मारुती इंटिरियर प्रॉडक्ट्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स 16 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग 68.5 रुपये किमतीवर झाली होती. आज बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.65 टक्के घसरणीसह 154.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. या स्टॉकने लिस्टिंग झाल्यानंतर आपल्या गुंतवणुकदारांना 154 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी मुख्यतः सॉलिड बेस व्हर्टिकल स्टोरेज, सॉलिड बेस कॉर्नर स्टोरेज, सॉलिड बेस ड्रॉवर पुल आउट, किचन कॅबिनेट, वायर बेस मिडवे स्टोरेज, यांच्या निर्मिती आणि निर्यात उद्योगात गुंतलेली आहे.

6) व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स 24 मे रोजी 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीचे शेअर्स 335 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आज बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.076 टक्के घसरणीसह 720.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी यांतून 115 टक्के परतावा कमावला आहे. व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स ही कंपनी मुख्यतः स्टेनलेस स्टील पाईप्स आणि सीमलेस ट्यूब आणि पाईप्सची उत्पादक आणि निर्यातक म्हणून काम करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO Investment stocks given multibagger return in one year details on 01 March 2023.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x