 
						IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नवीन टोल वाढ लागू केल्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. हा टोल वाढीचा निर्णय आयआरबी इन्फ्रा कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकतो.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरबी इन्फ्रा स्टॉक 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 10.31 टक्क्यांच्या वाढीसह 72.89 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 27 मे 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 76.55 रुपये किमतीवर पोहचला होता. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 3.57 टक्के वाढीसह 69.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयआरबी इन्फ्रा स्टॉक व्यतिरिक्त अशोका बिल्डकॉन कंपनीचे शेअर्स देखील तुफान तेजीत धावत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 199.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी अशोका बिल्डकॉन 2.14 टक्के वाढीसह 183.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कंपन्या हायवे ऑपरेटर आहे. यांनी टोल दर वाढ लागू केली आहे, जी जून 2024 पासून लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकांमुळे अंमलबजावणीची तारीख एप्रिल वरून जूनमध्ये ढकलण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी एप्रिल 2024 मध्ये टोल दर वाढ करण्यात आली नाही. आता याची अंमलबजावणी सुरू करून त्यात 3 टक्के ते 5 टक्के पर्यंत वाढ करण्यात आली आहे. भारतातील टोल शुल्क दर देशांतील महागाईनुसार बदलत असतात. महामार्ग चालकांनी सोमवारपासून भारतात 1100 टोल प्लाझावर टोल दरात 3-5 टक्के शुल्क वाढ केली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, निवडणूक प्रक्रिया संपल्यामुळे नवीन टोल दर लागू करण्यात आले आहे. टोल शुल्कात वाढ केल्याने आणि इंधन उत्पादनांवरील कर वाढ केल्यामुळे राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार होण्यास मदत होते.
विरोधी राजकीय पक्ष आणि अनेक वाहन मालक टोल दर वाढीवर टीका करतात. मागील दहा वर्षांत राष्ट्रीय महामार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि विकास करण्यात आला आहे. भारतील एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी 1.46 लाख किमी आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रस्ते नेटवर्क भारतात आहे. 2018-2019 या आर्थिक वर्षात टोल वसुली 25200 कोटी रुपये होती. ती 2022-2023 मध्ये 54 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		