 
						IRCON Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात काही ठराविक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यामधे भारतीय रेल्वे क्षेत्रातील कंपन्या सर्वात पुढे आहेत. रेल विकास निगम, IRFC, IRCON यासारख्या रेल्वे कंपन्या आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून देत आहेत. IRCON कंपनीचे शेअर्स शनिवारी 15 टक्क्यांच्या वाढीसह आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत.
शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तज्ञांच्या मते, केंद्र सरकार वर्षी रेल्वे क्षेत्राला मोठा निधी वाटप करू शकते. IRCON कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 231.35 रुपये किमतीवर ओपन झाले होते आणि काही तासात हा स्टॉक 261.35 रुपये किमतीवर पोहोचला होता. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 17.25 टक्के वाढीसह 267.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2024 या नवीन वर्षाची सुरुवात होऊन काही दिवसच झाले आहेत. या काळात IRCON कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. IRCON कंपनीच्या शेअर्सने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका वर्षात IRCON कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 276 टक्के परतावा कमावून दिला आहे. IRCON स्टॉक 50.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 421 टक्के मजबूत झाला आहे.
मागील 6 महिन्यांत IRCON कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 187 टक्के परतावा कमावून दिला आहे. IRCON कंपनीच्या शेअर्स व्यतिरिक्त रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 320.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर IRFC कंपनीचे शेअर्स 9.7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आता IRCTC कंपनीचे शेअर्स देखील आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		