12 December 2024 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

Tejas Networks Share Price | टाटा ग्रुपचा शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणुकदारांनी नेमकं काय करावे?

Tejas Networks Share Price

Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनमध्ये दरम्यान तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर 7.29 टक्क्यांच्या घसरणीसह 801.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स 864.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीचे शेअर्स 939.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 15 टक्के खाली आले आहेत. मागील वर्षी 18 ऑक्टोबर 2023 रोजी तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स 939 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये तेजस नेटवर्क स्टॉक 4.25 टक्के घसरणीसह 812.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील वर्षी जानेवारी 2023 या महिन्यात तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स 510.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेजस नेटवर्क कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत तेजस नेटवर्क कंपनीला मजबूत तोटा सहन करावा लागला आहे. तेजस नेटवर्क कंपनीला डिसेंबर तिमाहीत 44.87 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तेजस नेटवर्क कंपनीला 15.15 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. म्हणजेच आता या कंपनीचा तोटा वाढला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत तेजस नेटवर्क कंपनीचा ऑपरेशनल महसूल 103.96 टक्क्यांच्या वाढीसह 559.96 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कालावधीत तेजस नेटवर्क कंपनीने 274.55 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत तेजस नेटवर्क कंपनीचे खेळते भांडवल 671 कोटी रुपये वाढले आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत तेजस नेटवर्क आणि तिच्या उपकंपनींचे 31 पेटंट मंजूर झाले करण्यात आले आहेत. टाटा समूहाच्या या कंपनीच्या प्रवर्तकांनी डिसेंबर 2023 पर्यंत तेजस नेटवर्क कंपनीचे 55.80 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तेजस नेटवर्क ही कंपनी टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. यात पॅनाटोन फिनव्हेस्ट लिमिटेड कंपनीचा वाटा सर्वात मोठा आहे.

तेजस नेटवर्क ही कंपनी मुख्यतः ऑप्टिकल आणि डेटा नेटवर्किंग संबंधित उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. तेजस नेटवर्क कंपनी जगभरात 75 पेक्षा जास्त देशामध्ये दूरसंचार संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी इंटरनेट सेवा प्रदाते, संरक्षण आणि सरकारी संस्थांना नेटवर्किंग उत्पादने डिझाइन करण्याचा व्यवसाय देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tejas Networks Share Price NSE Live 22 January 2024.

हॅशटॅग्स

Tejas Networks Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x