
IREDA Share Price | बुधवारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 3.13 टक्क्यांनी वाढून 211.80 रुपयांवर (NSE: IREDA) पोहोचला आहे. IREDA कंपनीचा IPO गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 32 रुपयांच्या किमतीत लाँच झाला होता. IREDA शेअर जवळपास 90 टक्के प्रीमियमसह 60 रुपयांवर लिस्ट झाला होता. (इरेडा कंपनी अंश)
IREDA शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत 310 रुपये होती. 15 जुलै 2024 रोजी IREDA शेअरने या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. अवघ्या ८ महिन्यांत IREDA शेअरने गुंतवणूकदारांना 900% परतावा दिला आहे.
ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने IREDA शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने IREDA शेअरसाठी 280 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील 6 महिन्यात IREDA शेअरने 18.82% परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात या शेअरने 253% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 102.39% परतावा दिला आहे.
दुसऱ्या तिमाहीत नफा वाढला
दुसऱ्या तिमाहीत इरेडाचा निव्वळ नफा 36 टक्क्यांनी वाढून ३८७.७५ कोटी रुपये झाला आहे. इरेडा कंपनीचे उत्पन्न वाढल्याने नफ्यात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत IREDA कंपनीला २८४.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.