
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 220-230 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( आयआरईडीए कंपनी अंश )
मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये आयआरईडीए स्टॉक 32 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. सूचीबद्ध झाल्यानंतर काही दिवसांतच हा स्टॉक 214 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 3.79 टक्के वाढीसह 191.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच आयआरईडीए कंपनीने आर्थिक वर्ष 2030 पर्यंत महारत्न दर्जा प्राप्त करण्याची योजना आखली आहे. या कालावधीत कंपनीने आपले कर्ज बुक 6 पट अधिक वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. नुकताच या कंपनीचे 147.5 कोटी म्हणजेच जवळपास 55 टक्के शेअर्स लॉक-इन कालावधी संपल्यानंतर ट्रेडिंगसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 150 रुपये ते 180 रुपये किमतीच्या दरम्यान कन्सॉलिडेशन पाहायला मिळत आहे. टेक्निकल चार्टवर या स्टॉकने 155 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक काही दिवसात 230 रुपये किमतीवर जाऊ शकतो. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टेक्निकल चार्टवर या स्टॉकने 160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.