13 December 2024 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Property Sale Tax | आज किंवा उद्या जुने घर विकून नवीन खरेदी केल्यास टॅक्स मधून सुटका हवी असल्यास हे लक्षात ठेवा

Property Sale Tax

Property Sale Tax| जर तुम्ही जुने घर विकून नवीन घर खरेदी करत असाल तर तुम्हाला आयकराचे नियम माहित करून घेणे गरजेचे आहे. घराची खरेदी-विक्री करणे हा एक मोठा व्यवहार असतो. या व्यवहारात तुम्हाला पैसा मिळत असतो. त्यामुळे तुमच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये बदल होऊ शकतो. त्या वाढीव श्रेणीनुसार तुम्ही आयकर भरला नाही, तर आयकर विभाग तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतो. त्यामुळे जर तुम्ही जुने घर विकून नवीन घर घेत असाल, तर कर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. सोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर आयकर कायद्यात काय तरतुदी आहेत? ते विकल्यावर कोणते कर नियम लागू होतील ? याची माहिती जाणून घ्या.

जुने घर विकून नवीन खरेदी करताय? जाणून घ्या कर बचत कशी करावी. जर तुम्ही वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता विकत असाल तर त्यावर तुम्हाला दीर्घकालीन किंवा अल्प मुदतीच्या आधारावर कर भरावा लागेल. यालाच भांडवली नफा कर असे म्हणतात. मालमत्तेच्या विक्रीवर भांडवली नफ्याच्या आधारावर आयकर मोजला जातो आणि त्या आधारावर तुमच्या आयकर श्रेणीमध्ये तो जोडला जातो.

घर खरेदी विक्रीबाबत आयकराचे नियम :
घराची विक्री आणि खरेदी हा पैशाचा एक मोठा व्यवहार आहे. आणि यामध्ये तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो. या व्यवहाराचा परिणाम तुमचा टॅक्स ब्रॅकेटवर होऊ शकतो, किंवा त्यात वाढ होऊ शकते. सर्व प्रथम, वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या व्यवहाराबद्दल माहिती घेऊ. जेव्हा तुम्ही वारसा हक्काने एखादी मालमत्ता घेता, तेव्हा ती घेताना तुम्हाला कोणताही कर भराव लागत नाही, आणि त्यावर आयकराचा कोणताही नियम लागू होत नाही. तथापि, भारतातील काही राज्यात सरकार अशा वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तांच्या कागदपत्रांसाठी शुल्क घेते. पण त्याचा आयकराशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. अशी वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता आयकराच्या कक्षे बाहेर आहे.

वारशाने मिळालेल्या मालमत्तेवर आयकर :
काही लोकांना असा प्रश्नही पडला असेल की, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न जसे की भाडे, यावर आयकर आकारला जाईल का? जर तुमच्याकडे वारसा हक्काने मिळालेली अशी एखादी मालमत्ता आहे, जी तुम्हाला उत्पन्न मिळवून देत आहे, तर ते उत्पन्न पूर्णतः तुमचे मानले जाईल. त्यामुळे जे उत्पन्न आयकर कक्षेअंतर्गत करपात्र मानले जाईल. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला कोणाकडूनही एखाद्या कंपनीचे शेअर किंवा एफडी भेट म्हणून मिळाली, तर तुम्हाला त्यावरील उत्पन्नावरही आयकर भरावा लागेल.

भांडवली नफ्यावर आयकर गणना :
जर तुम्ही वारसा मिळालेली मालमत्ता विकली तर त्यावर दीर्घकालीन किंवा अल्प मुदतीच्या आधारावर आयकर भरावा लागेल. याला भांडवली नफाकर म्हणजेच Capital Gain Tax असे म्हणतात. जेव्हा तुम्ही एखादी मालमत्ता विकता त्यावर तुम्हाला मिळालेल्या भांडवली नफ्याच्या आधारावर आयकर मोजला जातो. तथापि, यावर तुम्ही कर बचतही करू शकता. ज्यामध्ये काही अटीचे पालन करून तुम्ही भांडवली नफ्यावर लागणारे कर वाचवू शकता. समजा तुम्ही वारसा हक्काने मिळालेले घर विकले, आणि त्यावर तुम्हाला काही प्रमाणात भांडवली नफा मिळाला असेल, तर त्यावर तुम्हाला आयकर भरावा लागेल. मात्र जर तुम्ही घर विक्रीच्या पैशातून दुसरे नवीन घर खरेदी केले तर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

ITR मध्ये कमाई दाखवणे आवश्यक :
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकल्यावर मिळालेले पैसे आयकर विवरणपत्रात दाखवले नाही तर काय होईल? यासाठी कर विभाग काही कारवाई करू शकतो का? तुमचा प्रश्न खूप योग्य आहे. कोणत्याही मालमत्तेच्या विक्रीवर जर तुम्हाला भांडवली नफा मिळाला तर तो आयटीआरमध्ये दाखवला गेला पाहिजे. समजा तुम्ही हा भांडवली नफा ITR मधे दाखवत नसाल तर आयकर विभाग तुमच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करू शकतो. हा खरेदी विक्रीचा व्यवहार तुमच्या वार्षिक माहिती स्टेटमेंटमध्ये दिसून येईल, आणि सोबत तुम्हाला मिळालेला भांडवली नफाही त्यात असेल. जर हे तुमच्या आयटीआर मध्ये नमूद नसले, तर आयकर विभाग तुमच्यावर दंडात्मक कारवाई करेल. आयकर विभागाच्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कमावलेल्या भांडवली नफ्यावर कर भरा, आणि तो ITR मध्ये दाखवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Property Sale Tax Rules regarding Capital Gain Tax under Income Tax act on 02 April 2023.

हॅशटॅग्स

Property Sale Tax(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x