
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 146 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
बुधवारी देखील या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील एका महिन्यात आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 30 टक्के कमजोर झाले आहेत. आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 4.12 टक्के घसरणीसह 140.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
06 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 214.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मच्या अहवालानुसार आयआरईडीए कंपनीचा सहा महिन्यांचा लॉक-इन कालावधी 30 मे 2024 रोजी संपणार आहे. हा लॉक इन कालावधी संपल्यावर 147.8 कोटींपेक्षा अधिक शेअर्स ट्रेडिंगसाठी पात्र होतील.
29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 32 रुपये होती. शेअर लिस्टिंगच्या दिवशी 60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंग नंतर अवघ्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 105.33 टक्के वाढले होते. या कंपनीचा IPO स्टॉक 32 रुपये या आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 358 टक्के वाढला होता.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. या स्टॉकमध्ये 130 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आयआरईडीए स्टॉकमध्ये 165-175 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 135 रुपये ते 180 रुपये या ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करू शकतात.
टिप्स टू ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 164 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि 141 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, मंदीच्या काळात या कंपनीचे शेअर्स 124 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. नुकताच आयआरईडीए कंपनी आणि पंजाब नॅशनल बँकेने भारतात अक्षय ऊर्जा उपक्रमाला हातभार लावण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.