13 December 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर्स पुन्हा तेजीत येणार? कंपनीबाबत मोठी अपडेट आली

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील आदिलाबाद येथून ऑनलाइन माध्यमातून एसजेव्हीएन कंपनीचे एकूण 5515 कोटी रुपये मूल्याचे चार प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. आणि तीन विविध प्रकल्पांची पायाभरणी केली. हे प्रकल्प उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यात स्थित आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 125.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 2.19 टक्के घसरणीसह 118.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मोदींनी लोकार्पण केलेल्या प्रकल्पात उत्तराखंड राज्यातील 60 मेगावॅट क्षमतेचा नटवर मोरी जलविद्युत केंद्र आणि 75 मेगावॅट क्षमतेचा प्रासन सौर ऊर्जा केंद्र, 75 मेगावॅट क्षमतेचा गुऱ्हा सौर ऊर्जा केंद्र आणि उत्तर प्रदेश राज्यातील 50 मेगावॅट क्षमतेचा गुजराई सौर ऊर्जा केंद्र यांचा समावेश आहे.

याशिवाय, पंतप्रधानांनी एसजेव्हीएन कंपनीच्या तीन प्रकल्पांची पायाभरणी देखील केली आहे. यामध्ये 382 मेगावॅट क्षमतेचा सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्प, हिमाचल प्रदेश राज्यातील 15 मेगावॅट नांगल ‘फ्लोटिंग’ सौर ऊर्जा प्रकल्प आणि आसाम राज्यातील 70 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सामील आहे. एसजेव्हीएन या सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा उत्पादक कंपनीने म्हंटले की, हे प्रकल्प 2070 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्दिष्टात योगदान देतील.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 125.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 280 टक्के परतावा कमावून दिला आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकाकडे कंपनीचे 81.85 टक्के भाग भांडवल होते. तर भारत सरकारने देखील या कंपनीचे 2,16,13,45,449 शेअर्स म्हणजेच 55 टक्के भाग भांडवल धारण केले होते. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीचे 18.15 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 06 March 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x